आमदार संतोष बांगर आणि आमदार संजय गायकवाड यांच्यावर देखील कारवाई करा

भाजप महिला मोर्चाची मागणी

*⚡कुडाळ ता.२६-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवत आघाडी सरकारने सूडबुद्धीने अटक कारवाई केली आहे. ती निषेधार्ह आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हिंगोली आमदार संतोष बांगर आणि बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानाबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुडाळ तालुका भाजप महिला मोर्चाच्या वतीने पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page