तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष कोंडके यांचे निरोप समारंभात प्रतिपादन
: देवगड वैद्यकीय सेवा बजावीत असताना जनतेचे आशिर्वाद तसेच अधिकारी,कर्मचारी याचे सहकार्य मिळाले व ही सेवा बजावीत असताना सकारात्मक दृष्टीकोन बाळगला नेहमी तोच दृष्टीकोन आपण सर्वांनी बाळगला व बी पॉझिटिव्ह राहिले तर निश्चित आपली सेवा यशस्वी होते.देवगड तालुकयतील जनतेने गेल्या १२ वर्षात भरभरून प्रेम व आपुलकी दिली .असे प्रतिपादन देवगड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष कोंडके यांनी व्यक्त केले. देवगड पंचायत समितीच्या सभागृहात देवगड तालुका आरोग्य विभागाच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष कोंडके यांची प्रशासकीय बदली फलटण येथे झाली या निमित्त आयोजित केलेल्या निरोप समारंभात डॉ.कोंडके यांनी सत्काराला उत्तर दिले. या वेळी व्यासपीठावर डॉ संतोष कोंडके उभयता , सभापती रवी पाळेकर,जिल्हा माता बाल संगोपन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉसंदेश कांबळे गटविकास अधिकारी ,जयप्रकाश परब,तालुका आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र राठोड,वैद्यकीय अधिकारी मेहुल जाधव,डॉ सोनाली तेली,डॉ,जयंत जाधव,डॉ श्रीमती कोटूरवार,डॉ ढवळे,डॉ.वाघमारे, व अन्य उपस्थित होते. सूत्रसंचलन स्वप्नील झोरे,प्रास्तविक डॉ रवींद्र राठोड,यांनी केले .या वेळी वैद्यकीय अधिकारी,अधिपरिचरिका आरोग्य,सहायक,आरोग्य सहाययिका,आशा गतप्रवर्तक ,आरोग्य सेवक यांनी डॉ .कोंडके यांचे गुणगौरपर विचार मांडले. गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी आपल्या मार्गदर्शनात चांगले अधिकारी चांगले मित्र होतात .परंतु त्यांच्या चांगल्या गुणांचा त्यांना त्रास होतो. परंतु डॉ कोंडके हे अपवाद असून त्यांचा मनकवडा व चांगुलपणा या गुणामुळे त्यानी तालुक्यात नावलौकिक प्राप्त केला.असे नमूद केले. या वेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे म्हणाले,कोरोना संक्रमण काळात देवगड तालुक्यात डॉ संतोध कोंडके यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य यंत्रणेने केलेले कार्य उल्लेखनीय असून साथीच्या रोगात सामोरे जाण्याचे काम आरोग्य यंत्रणेने केले.दोन लाटा समर्थपणे झेलणाऱ्या आरोग्य यंत्रणेने तिसरी लाट ही जोमाने झेलतील असा आत्मविश्वासही व्यक्त केला. [आपल्या अध्यक्षीय भाषणात सभापती रवी पाळेकर यानी अधिकारी लोकप्रतिनिधी या नात्यापेक्षा मैत्री असल्याने तालुका आरोग्य अधिकारी म्हणून सेवा बजावीत असताना राजकीय विचारप्रनाली जरी वेगवेगळी असली तरी सर्व राजकीय मंडळींशी त्यांचे संबंध मैत्रीचे असल्याने कधीही तक्रार निर्माण झाल्या नाहीत आणि असे अधिकारी तालुक्याला आदर्शच असतात असे आवर्जून नमूद केले या सोहळ्यात तालुका आरोग्य विभाग,प्रा. आ. केंद्र,यांच्यावतीने तसेच अन्य विभागाच्या वतीने डॉ संतोष कोंडके यांचा शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच कोरोना काळात उत्कृष्ट चालक सेवा बजावलेल्या चालक सुमित जाधव,प्रदिप मिठबावकर यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.उपस्थितांचे आभार श्री सोमजी यांनी मानले.
