लोखंडी पाईपचा डोक्यावर वार करून केले गंभीर जखमी

सावंतवाडी तालुक्यातील घटना ; पोलिसात गुन्हा नोंद

*⚡सावंतवाडी ता.२५-:* गवतावर औषध फवारणी करताना विचारणा केल्याच्या रागातून हातातील लोखंडी पाईप ने डोक्यावर वार करून गंभीर जखमी करण्याची घटना गवत असणाऱ्या एका जमिनीवर तेथील एक युवक विषारी औषध फवारणी करत असता, त्याची विचारणा केल्याने त्या युवकाने विचारणा करणाऱ्या युवकाच्या डोक्यात हातातील लोखंडी पाईप मारून त्या युवकाला गंभीर जखमी करण्याची घटना तालुक्यात घडली .याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात युवक जमिनीवर वाढलेल्या गवतावर विषारी औषध फवारणी करत असल्याचे तेथील एका युवकाचा निदर्शनास आले. त्या ठिकाणी गावातील अनेक गुरे चराई करत असल्याने या औषधांमुळे त्या गुरांना अपाय होऊ शकतो किंवा ती गुरे दगाऊ शकतात. अशी चुकीची घटना घडू नये यासाठी त्यांनी सबंधित युवकास फवारणी करण्यास अटकाव करत विचारणा केली असता, या गोष्टीचा राग आल्याने सबंधित युवकाने हातात असलेला लोखंडी पाईप विचारणा करणाऱ्या युवकाच्या डोक्यावर मारून त्यांला गंभीर जख्मी केले आहे. याबाबत जख्मी युवकाने पोलिस स्थानकात धाव घेत त्या युवका विरोधात तक्रार दाखल केली असता, पोलिसांनी सबंधित युवकावर गुन्हा दाखल केला आहे.

You cannot copy content of this page