*⚡सावंतवाडी ता.२४-:* सन २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या एन्. एम्. एम्. एस्. (राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या मागास शिष्यवृत्ती परीक्षा) परीक्षेत कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी येथील इयत्ता आठवी मधील कुमार पार्थ राजेश वाडकर हा खुल्या प्रवर्गातून गुणवत्ता यादीमध्ये सहावा आला आहे. या परीक्षेत कुमार पार्थ राजेश वाडकर, कुमार यश गणपत कदम या दोन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. दोन्ही विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. कु.पार्थ वाडकर व कु.यश कदम यांच्या यशाबद्दल त्याचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणार्या प्रशालेतील शिक्षिका श्रीमती एस. एस. दळवी व सर्व शिक्षक यांचे मुख्याध्यापक श्री एन. पी. मानकर, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक श्री प्रदीप सावंत, संस्था सचिव डॉक्टर श्री प्रसाद नार्वेकर, संस्था अध्यक्ष श्री शैलेश पई, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर, शिक्षकेतर कर्मचारी,पालक वर्ग यांनी अभिनंदन केले.
कळसुलकर हायस्कूलचे एन्. एम्. एम्. एस्. परीक्षेत यश
