राणेवर गुन्हा दाखल करा…गुन्हे दाखल न झाल्यास जन आशीर्वाद यात्रा रोखणार…!

कणकवली तालुका शिवसेनेच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

*⚡कणकवली ता.२४-:* महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बदनामीकारक व शिवसैनिकांच्या भावना दुखवणारी व्यक्तव्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे हे जन आशीर्वाद यात्रे दरम्यान करीत आहेत. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यच्या संदर्भात नारायण राणे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत व भारतीय दंड विधान अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, हे गुन्हे दाखल न झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,तसेच भाजपची जन आशीर्वाद यात्रा शिवसैनिक रोखतील असा इशारा कणकवली तालुका शिवसेनेतर्फे तालुका प्रमुख शैलेश भोगले यांनी दिला.यावेळी याबाबतचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्याकडे सादर केले. कणकवली पोलीस ठाण्यात यावेळी उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये,तालुका प्रमुख शैलेश भोगले,नगरसेवक सुशांत नाईक,कन्हैया पारकर,शहरप्रमुख शेखर राणे, उपशहरप्रमुख प्रमोद मसुरकर,अँड हर्षद गावडे,रुपेश आमडोस्कर, विलास गुडेकर, ललित घाडीगावकर,शिरीष घाडीगवकर, संतोष गुरव,आनंद ठाकूर,रोहित राणे,निसार शेख ,सुभाष परब, अरुण राणे,गणेश राणे, प्राध्यापक सेना जिल्हाध्यक्ष सत्यवान राणे आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटले की केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बदनामीकारक व तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले आहे या घटनेचा शिवसेनेतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो तसेच नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे या यात्रेच्या माध्यमातून समाजातील निर्माण करणे व समाजातील अशांतता निर्माण करणे या दृष्टीने नारायण राणे हे सामाजिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये सातत्याने करत आहेत. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शांतता व कायदा सुव्यवस्था बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे अशा स्थितीत नारायण राणे यांच्याकडून सातत्याने होत असलेली वक्तव्ये लक्षात घेता यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही दिवसांवर गणेशोत्सव आलेला असतानाच नारायण राणे यांचीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील भडक व शांतता बिघडवणारी वक्तव्य ही जिल्ह्यातील शांतता बिघडण्यास कारणीभूत ठरणारी आहे त्यामुळे आतापर्यंत नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या नेत्यांच्या विरोधात केलेल्या बदनामीकारक व व सामाजिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य च्या संदर्भात नारायण राणे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत व भारतीय दंड विधान अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत हे गुन्हे दाखल झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

You cannot copy content of this page