*⚡मालवण ता.२३-:* केंद्र शासनाने सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) नंबरसाठी केलेल्या सक्ती व जाचक नियमावली अन्यायकारक असल्याचे सांगत देशभरातील सराफ व्यवसाईकानी आंदोलन छेडले असतानाच या आंदोलनात मालवण तालुका सराफ असोसिएशनने सक्रिय सहभाग घेत आज आपली दुकाने बंद ठेवली ग्राहक आणि व्यावसायिक याना ही सक्तीची नियमावली अन्यायकारक असून, त्यामुळे सराफ व्यवसाय, कारागीर व्यवसाय धोक्यात येणार आहे , केंद्र सरकारच्या या सक्तीला विरोध दर्शवत सर्व सराफ व्यावसायिक आपली दुकाने बंद ठेऊन आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी मालवण सराफ असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष अनिल मालवणकर, उपाध्यक्ष उमेश नेरुरकर, सेक्रेटरी गणेश प्रभुलकर, नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यासह दिलीप हिलोसकर, सिद्धार्थ जामसंडेकर, चंद्रवदन कुडाळकर, प्रसाद धारगळकर, राजेश कुडाळकर, राजा कारेकर, किरण कारेकर, विलास निवेकर, अनंत कुडाळकर, सचिन पेडणेकर, प्रकाश रेवणकर, संजय माशेलकर, सुहास सांगोडकर, शिवराज धामापूरकर, संजय पेंडुरकर, प्रकाश कुडाळकर, किशोर माशेलकर, सचिन पेडणेकर, शैलेश मालंडकर आदीनी दुकाने बंद ठेवून आंदोलनात सहभाग दर्शवला. यावेळी बोलताना मालवण सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी हॉलमार्क ला आमचा पाठिंबा आहे. असे दागिने आम्ही यापूर्वी पासून बनवून ग्राहकांना देत आहोत. दागिन्यांमध्ये सोन्याची किती शुध्दता किती कॅरेट सोने या सर्व बाबींची स्पष्टता होते. ग्राहकांची विश्वासार्हता आम्ही नेहमीच जपत आलो आहोत. मात्र शासनाचे नवनवीन कायदे जाचक पद्धतीने लादले जात असतील तर आम्हा व्यवसाईकांबरोबर ग्राहकांनाही ते त्रासदायक ठरणार आहेत. दरवेळी बनवलेले दागिने तपासणीसाठी पाठवून त्यावर नंबर नोंद करून घेणे. (HUID) ग्राहकाला तो दागिना देणे त्याची नोंद नावासह ठेवणे. ग्राहकांकडून १० हजार पेक्षा जास्त रक्कम रोख स्वरूपात न करणे. चेक व अन्य बँकिंग पर्याय स्वीकारणे. हे सर्व गुंतागुंत वाढवणारे असल्याचे सांगितले ज्या ग्राहकांना आम्ही विश्वासार्हता जपून नेहमीच चांगले देण्याचा प्रयत्न करतो त्या ग्राहकांना नव्या नियमावली वाढवून त्यांचा वेळ व पैसा अधिक वाढवून त्रास देण्याचा प्रकार होणार आहे. ग्राहकांना विलंबाने दागिने मिळणार आहेत. दागिना तयार करून तपासणीसाठी पाठवला असता तपासणी केंद्रावर दागिन्यांची मोडतोड करून तपासणीचा पर्याय खुला असल्याने असे दागिने परत करताना मजुरी वाढण्याची शक्यता अधिक आहे. तरी या सर्व बाबींचा शासनाने विचार करावा. नव्या नियमावलीत बदल व्हावा. यासाठी जिल्हा स्तर, राज्य स्तर व राष्ट्रीय स्तरावर प्रशासन पातळीवर निवेदने दिली जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिले जाणार आहे. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात त्यांचेही लक्ष वेधले जाणार असल्याचे मालवण सराफ व्यवसाईकांच्या वतीने सोमवारी माहिती देताना स्पष्ट करण्यात आले.
देशभरातील सराफ व्यवसायिकांच्या आंदोलनात मालवण तालुका सराफ असोसिएशनचा सहभाग
