*⚡कणकवली ता.२१-:* रक्षाबंधन हे भावाने बहिणीच प्रत्येक संकटात रक्षण कराव म्हणून प्रेमाचं बंध बांधला जातो.आज इतर सामाजिक घटका प्रमाणेच रक्तदाते हि प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष अनेक जीव वाचवत असतात. अश्या रक्तदात्यांना राखी बांधत कनकसिंधु शहर स्तर संघ यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान हि संकल्पनेला अभिप्रेत अनोख रक्षाबंधन साजरे केले. यावेळी 52 रक्तदाते यांनी रक्तदान केले. कै. दिपलक्ष्मी दत्ताराम मडव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीरात दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित कनक सिंधूशहरस्तर संघाच्या सौ. सुचिता पालव,सौ.दिव्या साळगावकर,सौ.प्रिया सरूडकर,सौ.स्नेहा कदम, सौ.स्वाती राणे, सौ.राजश्री पिळणकर,कु.प्रणाली कांबळे यांनी उपस्थिती रक्तदाते यांना रक्षाबंधन करत. सर्व रक्तदात्या बदल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी रक्तमित्र अमेय मडव, नगरसेविका कविता राणे, ग्रा.पं सदस्य संदीप मेस्त्री, किशोर राणे,रामदास विखाळे ,अमोल भोगले व इतर मान्यवर, रक्त संक्रमण विभाग कर्मचारी,सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सदस्य व मित्र परिवार उपस्थित होते.
कनकसिंधू शहरस्तर संघाने साजरा केले वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन
