फोंडाघाट येथे शेती अवजारे देखभाल व दुरुस्ती विषयावर शेतकरी प्रशिक्षण

*⚡कणकवली ता.२१-:* महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन 2021-22 अंतर्गत 23 ऑगस्ट 2021 रोजी राधाकृष्ण मंगल कार्यालय, हवेलीनगर, फोंडा येथे सकाळी 11.00 वा. जिल्ह्यांतर्गत शेतकरी प्रशिक्षण या बाबी अंतर्गत “शेती अवजारे देखभाल व दुरुस्ती” या विषयावर शेतकरी प्रशिक्षण आयोजित केले आहे. सदर शेतकरी प्रशिक्षणाच्या शुभारंभप्रसंगी कणकवली पं.स. चे सभापती मनोज रावराणे यांच्याहस्ते व उपसभापती प्रकाश पारकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके, प्रकल्प संचालक (आत्मा) सिंधुदुर्ग एस.एन. म्हेत्रे, उपविभागीय कृषी अधिकारी एस.एस. हजारे, शेतकरी मल्ला समिती अध्यक्ष (आत्मा) कणकवली वसंत तेंडुलकर, जि.प. सदस्य व शेतकरी सल्ला समिती सदस्य संजय आग्रे, माजी सभापती सौ. सुजाता हळदिवे, ग्रामपंचायत फोंडा सरपंच संतोष आग्रे, ग्रामसेवक भाऊ चौलकर, कृषी व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कणकवलीचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. पाटील, कृषी अधिकारी डी.एम. तोरणे, कृ.प. आर.एस. सावंत, कृ.प. व्ही.एच. निकुम, कृषी सहाय्यक सौ. अक्षया परब हे उपस्थित आहेत. सदर पशिक्षणासाठी क्षताक्षी अ‍ॅग्रो सर्व्हिस, तळेरेचे डीलर व मेकॅनिकल सागर दळी यांचे शेती अवजारे देखभाल व दुरुस्ती या विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे. तरी सदर प्रशिक्षणास फोंडा पंचक्रोशीतील यंत्रधारक जास्तीतजास्त शेतकर्‍यांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कणकवली यांनी केले आहे.

You cannot copy content of this page