ओरोस येथे पार पडली नियोजन बैठक
*⚡बांदा दि.२०-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी आणि स्वागतासाठी भाजप जिल्हा युवा मोर्चाची नियोजन बैठक जिल्हाध्यक्ष आनंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस येथे पार पडली. यावेळी नारायण राणे यांचे स्वागत भव्यदिव्य पद्धतीत व्हावे असे विचार सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
