परशुराम उपरकर यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

२३ ऑगस्टच्या आंदोलनाबाबत केली चर्चा

सिंधुदुर्गनगरी ता २० सिंधुदुर्ग जिल्हा प्रामुख्याने पर्यटन जिल्हा असूनही अवैध मायनिंग तसेच सिलिका प्रकल्प, अफाट वृक्षतोड आदी पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्रकल्प व या सर्वांना पाठीशी घालणारे जबाबदार भ्रष्ट अधिकारी यांच्या कारभाराची चौकशी होवून तात्काळ कारवाई व्हावी. या प्रमुख मागणीसाठी तसेच जिल्ह्याची पर्यावरण समृद्धी टिकवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवार २३ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्गनगरी सिडको कार्यालय परिसर ते जिल्हाधिकरी कार्यालय प्रवेशद्वार असे मनसेच्या आंदोलनाचे स्वरूप असून अलीकडील काळात उद्भवलेली महापूर सदृश्य परिस्थिती त्यात झालेली वित्त व जीवित हानी,भूस्खलनमुळे ओढवलेली आपत्ती,कळणे मायनिंग परिसरात गावावर ओढवलेली आपत्ती तसेच जमीन महसूली निवाड्यामधील जनतेच्या तक्रारी आदी बाबींवर गंभीरपणे पाहता याला तत्कालीन खनिकर्म अधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी जबाबदार आहेत. ही खरी वस्तुस्थिती आहे.शिवाय करोडो रुपयांचा महसूल बुडीत करून वैयक्तिक हितसंबंध जोपासत शासनाचे नुकसान करणे असेही प्रकार महसूल विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांकडून घडत आहेत.पर्यावरणाने सुख समृद्ध आपल्या जिल्ह्यात मायनिंग लॉबीला पाठीशी घालणाऱ्या नतभ्रष्ट अधिकारीशाहीतून जिल्ह्याची सुटका होणे काळाची गरज असून जिल्ह्याच्या भविष्याचा प्रश्न आहे.राज्यातील सत्ताधारी याबाबत जागरूक नसून दुर्लक्ष करत असल्याने अधिकऱ्यांकडून मनमानी करत स्थानिक ग्रामस्थानांचा विरोध दडपला जातो.मायनिंग माफियांच्या विरोधात जनतेच्या तीव्र भावना प्रशासनाकडे मांडण्यासाठी आणि महसुल च्या या बड्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशीच्या मागणीसाठी मनसे रस्त्यावर उतरत असून “अप्पर जिल्हाधिकारी हटाव..पर्यावरण बचाव” असा आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमींनी या मोर्च्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या भावना मांडाव्यात असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात येत असून सदरील मोर्चा दरम्यान वाढती महागाई,पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात केंद्र व राज्य सरकारचा निषेध दर्शवण्यासाठी मनसेच्या वतीने निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज प्रसार माध्यमांकडे दिली .यावेळी कुडाळ तालुकध्यक्ष प्रसाद गावडे, सचिव राजेश टंगसाळी,संतोष सावंत,अमोल जंगले आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page