कोकणातील जनआशीर्वाद यात्रा हार तुरे स्वीकारण्यासाठी

खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका

देवगड-प्रतिनिधी कोकणामधील केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा हि पर्यटन यात्रा असल्या सारखीच असून हार तुरे स्वीकारण्यासाठीच या जन आशीर्वाद यात्रेचा उदिष्ट मंत्री राणे यांचा आहे अशी घणाघाती टिका खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. तळेबाजार येथील भवानी मंगल कार्यालयामध्ये देवगड तालुका शिवसेना कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये आयोजन केले होते. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर तालुका प्रमुख मिलिंद साळसकर,विलास साळसकर,जिल्हा महिला आघाडी प्रमुख निलम पालव सामंत,माजी सभापती रविंद्र जोगल,शिवसेना उपतालुका प्रमुख बुवा तारी, विभाग प्रमुख तुषार पेडणेकर,सुनिल जाधव,राजु शेटे,हर्षद गावडे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार राऊत म्हणाले कि, देशामधील अनेक प्रश्न्‍ प्रलंबित आहेत. कोरोना विषाणूने थैमान घातलेला असताना अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय 40 मंत्रींना देश पर्यटनासाठी पाठविण्याचे काम केले आहे. यावरुन भाजपा विकास कामे करण्याऐवजी राजकारण करीत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. बाळासाहेबांच्या समृतीस्थळाला केंद्रीय मंत्री राणे भेट देणार आहेत. मात्र सर्वांत बाळासाहेबांना त्रास देण्याचे काम हे नारायण राणे यांनी केले असल्याने त्यांचा स्मृती स्थळाला भेट देण्याचा यामुळे नैतिक अधिकारी उरलेला नाही. देवगड-जामसंडे नगरपंचायतीची निवडणुक हि महायुतीच्या माध्यमातून लढविली जाणार आहे. आमचा हा शत्रृ पक्ष भाजपाच आहे. जिल्हा बँकेची निवडणुक व येणा-या सर्वच स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये शिवसेना पक्ष सत्ता काबीज करणार आहे.तसेच जिल्हा परिष्द व देवगड तालुक्यातील ग्रामपंचायती व पंचायत समितीमधील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यासाठी कोकण आयुक्तांकडे आपण तक्रार करणार असून व भ्रष्टाचाराच्या विरोधात न्याय मिळवून येथील जनतेला दिला जाणार आहे. जिल्हयामधील भाजपाच्या ताब्यामध्ये असलेल्या ग्रामपंचायत मधील 14 वा व 15 वा वित्त आयोगामध्ये कोरोना विषाणूच्या काळामध्ये निधी खर्च करुन भ्रष्टाचार केल्याचे दिसून येत आहे. सत्ता मिळवून आपला फायदा करुन घेणारा हा भाजपा पक्ष आहे. यामुळे अशा या जिल्हयामधील नारायण राणे युक्त असलेली भाजपाला धडा शिकविल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही. तौक्ते चक्रीवादळामधील नुकसान ग्रस्त शेतक-यांना सर्वाधिक नुकसान भरपाई हि उध्दव ठाकरे सरकारने दिली आहे. जनतेचे हित जोपासून त्यांना मदत करण्याचे काम नेहमीच शिवसेनेने केले आहे. यामुळे 20 ऑगस्ट रोजी देवगड तालुक्यामधील नुकसान ग्रस्त झालेल्या मच्छिमारांना निधीचा धनादेश पालकमंत्री यांच्या हस्ते देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. फोटो- खासदार विनायक राऊत पसपोर्ट साईज फोटो घेणे 

You cannot copy content of this page