*⚡कणकवली ता.१३-:* पनवेल येथील प्रशांत यशवंत पाटणकर ( ४०, मूळ रा. पंचशीलनगर, खारेपाटण ) यांचा खारेपाटण येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत मृतदेह आढळून आला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ही उघडकीस आली. प्रशांत यशवंत पाटणकर यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. प्रशांत पाटणकर हे पनवेल येथून ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता कामाला जातो असे पत्नीला सांगून राहत्या घरातून निघून गेले होते. मात्र , ते रात्री घरी परत न आल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने पनवेल येथील खांदेश्वर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर त्यांचा शोध घेतला जात होता.दरम्यान, शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास खारेपाटण येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत मृत अवस्थेत प्रशांत पाटणकर यांचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती राहुल रघुनाथ पाटणकर यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. यावेळी मृतदेहा शेजारी कीटक नाशक औषधांची बाटली सापडून आली आहे. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली का? तसे असेल तर त्यामागचे नेमके कारण काय?यादृष्टीने पोलीस माहीती घेत असल्याने घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार साबळे करीत आहेत.
खारेपाटण येथे युवकाचा संशयास्पद मृत्यू
