भजन महर्षी परशुराम पांचाळ बुवा यांचे केवळ स्मारक नसून कलाकारांसाठी कलादालन ठरेल

कणकवली पं.स. माजी उपसभापती बुवा संतोष कानडे यांचे प्रतिपादन

*⚡वैभववाडी ता.१३-:* भजन महर्षी कै. परशुराम पांचाळ बुवा यांनी सर्वाना ज्ञान दिले .त्याच्या जन्मभूमीत भव्य स्मारक होत आहे.हे केवळ स्मारक नसून येथील कलाकारांसाठी कलादालन उभे करणार आहोत असे प्रतिपादन कणकवली पंचायत समिती माजी उपसभापती बुवा संतोष कानडे यांनी केले. या स्मारकाचा शिलान्यास समारंभ गुरुवार १२ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता बुवा विलास परब यांच्या हस्ते झाला यावेळी जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष संदेश (गोटया) सावंत,अरविंद रावराणे,सुधीर नकाशे, सरपंच सौ.शिल्पा पाटील,बुवा रामदास कासले,प्रकाश पारकर,संतोष कानडे,श्रीकांत सिरसाट, चव्हाण, नाईकधुरी, राजकीय, सामाजिक, भजनी बुबा भजन क्षेत्रातील मोठया प्रमाणात उपस्थित होते. भजन महर्षी पांचाळ बुवा यांचे मुळ गाव कुसुर आहे. भजन क्षेत्राला नावलौकिक मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांचे हजारो शिष्यगण आज भजनी वारसा जपत आहेत. कै पांचाळ बुवा यांच्या निधनानंतर त्यांच्या शिष्यगणाकडून त्यांच्या मूळ गावी कुसुर येथे हे स्मारक उभारले जात आहे. कै पांचाळ बुवा यांचे पट्ट शिष्य श्री व सौ विजय परब बुवा उभयतांच्या हस्ते शिलाण्यास संपन्न झाला. तर या स्मारकासाठी संदेश उर्फ गोटया सावंत यांनी आजी आजोबांच्या स्मरणार्थ विनामूल्य जागा दिली आहे.त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले

You cannot copy content of this page