उपाध्यक्षपदी आशिष नाईक तर सचिवपदी वसिम सय्यद यांची निवड
*⚡कणकवली दि.१३-:* सिंधुदुर्ग जिल्हा प्राध्यापक सेना कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सत्यवान राणे,उपाध्यक्षपदी आशिष नाईक तर सचिवपदी वसिम सय्यद यांची निवड करण्यात आली आहे. सदरची कार्यकारिणी महाराष्ट्र प्राध्यापकसेना अध्यक्ष डॉ.धनराज कोहचाडे यांनी जाहीर केली आहे.या निवडीबद्दल सत्यवान राणे, आशिष नाईक, वसिम सय्यद यांनी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते संदेश पारकर यांचे आभार मानले.
