आमदार नितेश राणे यांच्या कार्याचा आदर्श राज्यातील इतर मतदारसंघात घेतला जाईल

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार;१६९ सरपंचांना विमा पॉलिसीचे वितरण

*⚡कणकवली ता.१३-:* परिस्थितीला आव्हान द्यायचे आणि परिस्थितीवर मात करायची ही केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची शिकवण आम. नितेश राणे यांनी स्वीकारली आहे. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सारपंचांसाठी राज्य सरकार काहीच करत नसेल तर त्यांच्या पाठीशी आम. नितेश राणे आहेत असा चांगला संदेश आज राज्यात गेला आहे.आम. नितेश राणे यांच्या या कामाचे अनुकरण राज्यातील इतर मतदारसंघात होईल आणि त्याचा फायदा सर्वच सरपंचांना मिळेल असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भाजपा आमदार नितेश राणे यांनी कणकवली, देवगड, वैभववाडी या आपल्या मतदारसंघातील १६९ सरपंचांना आरोग्य विमा स्वखर्चाने काडून दिला. त्या विमा पॉलिसीचे वितरण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन सहभागी झाले होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात कार्य कर्तृत्वाने स्वतःची छाप उमठविलेले आमदार म्हणजेच नितेश राणे होय. सरपंचाना राज्य सरकारने कोरोना काळात संरक्षण द्यावे ,त्यांच्या जीवितासाठी विमा संरक्षण द्यावे यासाठी आम.नीतेश राणे सातत्याने प्रयत्न केलेत.मात्र राज्य सरकारने शब्द पाळला नाही.कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या सरपंचाना वाऱ्यावर सोडले. आज कोरोना नियंत्रणात आला तो गावोगावच्या सरपंचांमुळेच. आमदार नितेश राणे सरपंचांच्या विमा संरक्षणाची जबाबदारी घेतली हे फार मोठे कार्य आहे. कोरोना टेस्टपासून उपचारपर्यत आवश्यक त्या सर्व सेवा येथे उपलब्ध झाल्या.जेव्हा आवश्यकता होती तेव्हा आरोग्य स्टाफ रत्नागिरी जिल्हात सुद्धा राणेंच्या पडवे व्हास्पिटल मधून दिला गेला हे रत्नागिरी दौऱ्यात कळले तेव्हा समाधान वाटले.अशा शब्दात रुग्णालयाने जनतेचे कसे प्राण वाचतात हे श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले. कोकणावर तीन संकटे आली त्यात निर्सग वादळ, तौक्ते चक्रीवादळ,महापूर अशा या संकटात भाजपा कार्यकर्ते कायम सेवा देत राहिले.हेच सेवेचे व्रत घेऊन आम. नितेश राणे यांनी सरकार करत नसेल तर ते आम्ही करू असा निश्चय करून सरपंचाना सुरक्षा कवच दिले.एक आदर्श समाजासमोर घालून दिला. कोरोना लस हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. देशात कोरोना लस देणात महाराष्ट्र अव्वल आहे अशा जाहिराती राज्य सरकार देते आणि दुसरी कडे केंद्र सरकार लस देत नाही म्हणून ओरडत आहे.केंद्राने लस दिली नाही तर तुम्ही अववल कसे झालात ? लस जमिनीतून उगवल्या काय ? अशा शब्दात राज्य सरकारवर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.राज्यात कोरोनाचे संकट आहे मात्र त्यावर आम.नितेश राणे सारखे लोकप्रतिनिधी आमचे सहकारी असताना या कोरोना संकटातून सुखरूप बाहेर पडू असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page