शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची माजी आम.परशुराम उपरकर यांनी घेतली भेट

*⚡कणकवली ता.१३-:* शिवशाहीर महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांचा तिथीनुसार 99 वा वाढदिवस साजरा करण्यात येत असून बाबासाहेब पुरंदरे यांच्या या वाढदिवसाचे औचित्य साधत मनसे सरचिटणीस माजी आम. परशुराम उपरकर यांनी त्यांना पुणे येथे जात शुभेच्छा दिल्या. यावेळी मनसे सरचिटणीस माजी आम. परशुराम उपरकर सोबत रत्नागिरी संपर्कप्रमुख अमोल साळुंखे, संजय धुरत ,संतोष सावंत, सचिन पाटणकर, अजिंक्य खैर आदी उपस्थित होते.यावेळी शिवशाहीर महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी संवाद साधत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

You cannot copy content of this page