मत्स्यपॅकेजचा लाभ न मिळाल्यास बेमुदत लाक्षणिक धरणे आंदोलन

सिंधुदुर्ग जिल्हा मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेच्या महिलांचा इशारा

*⚡मालवण ता.१३-:* सिंधुदुर्ग जिल्हा मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेच्या महिलांना मत्स्य पॅकेजचा लाभ ३१ ऑगस्टपर्यंत न मिळाल्यास २ सप्टेंबर रोजी मालवण येथील मत्स्य कार्यालयासमोर सकाळी १० पासून बेमुदत लाक्षणिक धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा या संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा केरकर यांनी मत्स्य विभागाला दिला आहे. क्यार व महा चक्रीवादळामुळे ऑगस्ट ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत मच्छीविक्रेत्या महिलांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्यामुळे शासनाने जाहीर ‘केल्याप्रमाणे मत्स्य व्यावसायिक महिलांना प्रत्येकी २ क्रेट खरेदी करण्यासाठी ६ हजार रुपयांप्रमाणे आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते. मात्र, काही मर्जीतील संस्थेच्या महिला सभासदांना याचा लाभ देण्यात आला. त्यामुळे काही राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली येऊन आमच्या सदस्यांना डावलले जात असल्याचा संशय निर्माण झाला आहे, असेही सौ. स्नेहा केरकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

You cannot copy content of this page