*⚡बांदा दि.१३-:* जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्रशाळेत इयत्ता चौथी इयत्तेत शिकणारी विद्यार्थीनी चिन्मयी सुरेश रूबजी हिने नागपंचमी सणाच्या निमित्ताने नागोबाच्या आकर्षक मूर्त्या बनवून आपल्या कलेची जोपसना केली. मूळचे रुबजी कुटुंबीय सावंतवाडी तालुक्यातील निगुडे या गावचे असून चिन्मयीचे आजोबा गवंडीकाम करत असत व गणपती सणाच्या निमित्ताने काही गणेशमूर्त्या बनवत असत हा वारसा त्यांचे मुलगे चालवत आहेत. गेले वर्षभराहून आधिक काळ लाॅकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने मोबाईलपासून दूर राहून आपल्या कुटुंबीयांकडून चिन्मयीने मातीकाम कला शिकून यावर्षी नागपंचमी सणाच्या निमित्ताने घरोघरी पुजल्या जाणाऱ्या २८ नागमूर्ती तयार करुन त्याची विक्री करून स्वकमाईचा आनंदही मिळवला. चिन्मयीने गणतीची आकर्षक मूर्ती बनविली आहे. तसेच ती आपल्या कुटुबियांतील पारंपरीक गणेशमूर्ती बनवायच्या व्यवसायाला रंगकाम करायला हातभार लावत आहे. यावेळी बोलताना चिन्मयीचे वडील सुरेश रुबजी यांनी सांगितले की, बालवयातच प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहीजे तसेच पर्यावरण पूरक मूर्तीचे पूजन करून निसर्गाचे संवर्धन करावे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना चिन्मयीने जोपासलेला छंद आदर्शवत असा आहे.
बांदा केंद्रशाळेची चिन्मयी जपतेय कलेचा वारसा
