त्रिंबक परिसरात बीएसएनएलचा टॉवर उभारावा मागणीसाठी मालवण व सावंतवाडी कार्यालयात धडक

त्रिंबक सरपंच विलास त्रिंबककर यांच्या नेतृत्वाखाली वाचला समस्यांचा पाढा

*⚡मालवण ता.१३-:* मालवण तालुक्यातील त्रिंबक गावामध्ये बीएसएनएलच्या मोबाईलला रेंज मिळण्यामध्ये अनेक समस्या निर्माण होत असल्याने ऑनलाईन सेवा सुविधेसह ऑनलाईन शिक्षण पद्धतीत अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे या परिसरात बीएसएनएलचा टॉवर उभारावा या मागणीसाठी त्रिंबक सरपंच विलास त्रिंबककर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी बीएसएनएलच्या मालवण आणि सावंतवाडी कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांसमोर समस्यांचा पाढा वाचला दरम्यान, येत्या आठवड्यात प्रत्यक्ष इंजिनियरना पाठवून सर्व्हे करण्यात येईल व रेंजची समस्या सोडविण्याचा आवश्यक तो प्रयत्न केला जाईल असे आश्वासन यावेळी बीएसएनएल अधिकाऱ्यांनी दिले. सध्या मुलांना ऑनलाइन शिक्षण, रेशनिंग, पोस्ट, तसेच इतर ऑनलाइन सेवा मिळण्यासाठी थ्री जी सेवा अत्यावश्यक आहे. रेंज अभावी येथील मोबाइल धारकांना गैरसोईचा सामना करावा लागतो. ही समस्या दूर व्हावी या उद्देशाने सरपंच त्रिंबककर यांच्या सह अर्चित लेले, किशोर त्रिंबककर, कमलाकांत बापट, दिगंबर वर्देकर, सुधीर त्रिंबककर, कमलाकर सावंत इ. ग्रामस्थानी मालवण व सावंतवाडी येथे बी. एस. एन. एल. च्या कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्या अडचणींचे निवेदन सादर केले होते.

You cannot copy content of this page