चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे दिविजा आश्रम असलदेला जीवनावश्यक वस्तू वाटप

*⚡कणकवली ता.१३-:* चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, “चिंचपोकळीचा चिंतामणी”यांच्यावतीने स्वस्तिक फाउंडेशन संचलित दिविजा आश्रम असलदेला जिवनावश्यक वस्तू, अन्नधान्य व आश्रमासाठी लागणारे इतर साहीत्याचे वाटप करण्यात आले. केवळ उपदेश न देता प्रत्यक्ष मदत नव्हे तर आपले कर्तव्यच आहे उद्देश डोळ्यासमोर ठेवून कार्य करणारी एक संस्था म्हणजे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजेच चिंचपोकळीचा चिंतामणी ‘परमेश्वर हा सर्वत्र व्यापलेला आहे, तो नाही अशी जागाच नाही’ असा केवळ उपदेश न करता प्रत्येक घटकात तो कसा आहे व त्याची सेवा कशी केली पाहिजे हे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ नेहमी कार्य करित दाखवून देत आले आहे.असेच एक समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतूनच मंडळाने सिंधुदूर्ग जिल्ह्यातील असलदे येथील निराधार आजी- आजोबांचे सेवा करणारे स्वस्तिक फाऊंडेशन संचालित दिविजा आश्रमास आवश्यक असणारे जिवनावश्यक वस्तू,अन्नधान्य तसेच इतर लागणारे आश्रम साहित्य,खाऊ यांचे वाटप करण्यात आले. यावेळीचिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ चिंचपोकळीचा चिंतामणी अध्यक्ष उमेश सिताराम नाईक मानदसचिव वासुदेव गजानन सावंत ,शशिकांत जाधव,महेश पेडणेकर, राजन डिचोलकर,अनिल आजगांवकर, प्रदिप हरयाण, विद्याधर घाडी,अनिल केरकर, भगवान हळदणकर, अक्षय मिराशी, प्रथमेश सकपाळ,प्रविण तळवळकरसंदेश शेट्ये,अविनाश फाटक,दीपिका राबडे, संजय धवण,साधना,किरण, सखाराम कोकरे, सायली इंदंप ,सायली तांबे,मंजिरी राणे, अनुजा आचरेकर, महादेव हुंबे,अस्मी राणे, कार्यक्रमास उपस्थित होते.

You cannot copy content of this page