संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राणे व सचिव गजानन नानचे यांनी वेधले लक्ष
*⚡वेंगुर्ले ता.१२-:* माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे ऑगस्ट महिन्याचे मासिक वेतन चतुर्थीपूर्वी मिळावे अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे शिक्षणाधिकारी यांचेकडे करण्यात आल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राणे जिल्हा सचिव गजानन नानचे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेश चतुर्थी हा उत्सव पासून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो गेल्या वर्षीपासून माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मासिक वेतन प्रत्येक महिन्याला उशिरा होत असल्याने शिक्षक व कर्मचाऱ्यांची कुचंबणा होत आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे फक्त नोकरीवरच अवलंबून असल्याने त्यांचे लक्ष महिन्याच्या पहिल्या तारखेवर असते त्याला अनुसरून गणेश चतुर्थी उत्सव जवळ आला असून माहे ऑगस्ट २०२१ चे मासिक वेतन ५ सप्टेंबर पूर्वी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मिळावेअशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जि प सिंधुदुर्ग यांच्याकडे करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष अनिल राणे सचिव गजानन नानचे यांनी कळविले आहे.
