कृषी स्वावलंबन योजना लाभासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

*⚡मालवण ता.१२-:* राज्य शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना सन २०२१ – २२ मध्ये राबविण्याची शासनाकडून अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मालवण पं.स. च्या वतीने प्रस्तावांची मागणी करण्यात आली आहे. या योजनेत अनु.जाती/नवबौद्ध शेतकर्यांना सिंचन क्षमता निर्माण कारणे, सिंचना खालील क्षेत्र वाढविणे, जमिनीत ओलावा टिकवून ठेवणे व त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नवीन विहीरसाठी अडीच लाख रु, विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार रु, वीजपंप साठी २० हजार रु, विज कनेक्शन साठी १० हजार रु, इनवेल बोरिंग साठी रु.२०हजार रु, शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण साठी रु. १ लाख, सुष्म सिंचन अंतर्गत तुषार, ठिबक सिंचन साठी रु.२५ हजार ते ५०हजार हेक्टरी मर्यादित अनुदान देय आहे. शेतकऱ्यांच्या नावे किमान ०.४० हे. व कमाल ६.०० हे. जमीन धारणा आवश्यक आहे. जमिनीचे सातबारा, आठ अ उतारे, जातीचा दाखला, आधार कार्ड, बँक पासबुक उतारा. उत्पन्नाचा दाखला रु-१५००००/-पेक्षा कमी असावा, तहसिलदार यांजकडील ग्रामसभा ठराव इ. कागदपत्र आवश्यक आहेत. लाभार्थीने अर्ज online वर https://mahadbtmahait.gov.in संकेत स्थळावर भरावा असे आवाहन सभापती, उपसभापती गटविकास अधिकारी वर्ग १, पंचायत समिती, मालवण यांनी केले आहे.

You cannot copy content of this page