सुरेश बापार्डेकर करणार खड्ड्यात बसून करणार उपोषण;१५ ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा दिला इशारा
*⚡मालवण ता.१२-:* पर्यटन केंद्र असणाऱ्या तारकर्लीकडे जाणाऱ्या वायरी केळबाई मंदिर ते तारकर्ली बंदर जेटी पर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुर्दशा झाली असताना याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे वेळोवेळी लक्ष वेधूनही या रस्त्याची डागडुजी अथवा डांबरीकरण न झाल्याने तारकर्लीतील सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी १५ ऑगस्ट पर्यंत या रस्त्याबाबत बांधकाम विभागाने समाधानकारक उत्तर न दिल्यास १७ ऑगस्ट रोजी तारकर्ली रस्त्यावर पडलेल्या खाड्यात बसून आमरण उपोषण करू व वाटल्यास आत्मदहनही करू, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. तारकर्ली रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकवेळा निवेदने सादर करत रस्त्याच्या डागडुजी व डांबरीकरण होण्याबाबत मागणी केली होती तसेच उपोषण व आंदोलनही छेडले होते. मात्र, अद्यापही या रस्त्याच्या डागडुजी बाबत बांधकाम विभागाने कोणतीही कार्यवाही न केल्याने बापर्डेकर यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. या रस्त्याच्या डागडुजी बाबत १५ ऑगस्ट पर्यंत बांधकाम विभागाकडून कोणतीही हालचाल न झाल्यास किंवा योग्य समाधानकारक उत्तर न मिळाल्यास १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजल्यापासून तारकर्ली रस्त्यावरील खड्यात बसून, कोविडचे नियम पाळून आमरण उपोषण आणि वाटल्यास आत्मदहन करू या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून डांबरीकरण करण्याची नक्की तारीख आणि नवीन हॉटमिक्स डांबरीकरण करण्याची नक्की तारीख लेखी पत्राद्वारे देत नाहीत तोपर्यंत त्याच जागेवर बसून उपोषण सुरूच ठेवणार असेही बापर्डेकर यांनी म्हटले.
