घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्याबाबत करण्यात आले नियाेजन
*⚡बांदा दि.१२-:* ऑल इंडिया इन्स्टिस्ट्युट लोकल सेल्फ ग्रुप कोल्हापूर संस्थेमार्फत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन गाव आराखडा तयार करणेबाबत बांदा गावाला भेट देण्यात आली. या भेटी दरम्यान गावातील कचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करणेबाबत नियाेजन करण्यात अाले. गावातील शाळा, अंगणवाडी, शासकीय कार्यालय, गृहभेटी स्वच्छतेच्या सुविधा या घटकांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी सरपंच अक्रम खान, सदस्य जावेद खतीब, साई काणेकर, किशोरी बांदेकर, रिया अल्मेडा, समीक्षा सावंत, पंचायत समिती कर्मचारी अविनाश सावंत, संस्था अधिकारी कर्मचारी परिक्षित चिलोडे, सागर कडव, विक्रम काळेभेरे आदी उपस्थित होते.
