रवी जाधव यांचे भर पावसात पालिकेसमोर उपोषण सुरू
*⚡सावंतवाडी ता.१२-:* बाजारपेठेतील स्टॉल काढून जे जप्त करण्यात आलेले समान पंचनामे कागदपत्र सहित पुन्हा मिळावे यासाठी रवी जाधव यांनी आपले उपोषण भर पावसात येतील पालिकेसमोर सुरू केले आहे. तसेच जोपर्यंत पंचनाम्याच्या कागदपत्र सहित जप्त सामान आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा मिळत नाही. तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.या उपोषणाला माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी देखील पाठिंबा दिला आहे. रवी जाधव यांनी पुन्हा एकदा नगरपालिके विरूद्ध उपोषण सुरू केले आहे.
