एडगाव पवारवाडी नळयोजनेसाठी १५ ऑगस्टला आंदोलन

भाजपाच्या अभिजित पवार यांचा इशारा

वैभववाडी प्रतिनिधी एडगांव पवारवाडी येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करा. या मागणीसाठी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अभिजित दशरथ पवार यांनी 15 ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन न.पा.पु योजनेचे उपअभियंता कणकवली यांना पवार यांनी दिले आहे. गेली दहा वर्ष या नळपाणी योजनेचे काम अर्धवट स्थितीत आहे. सदर काम पूर्ण होण्याकरिता वारंवार ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच ग्रामसभेत ही विषय चर्चेत आला आहे. ग्रामस्थांनी पालकमंत्री, आमदार यांचेदेखील लक्ष वेधले आहे. परंतु संबंधित प्रशासनाने याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी श्री. पवार यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

You cannot copy content of this page