गटारी साजरी करणाऱ्या मद्यधुंद युवकांनी बादली न दिल्याच्या कारणातून मारहाण

*⚡सावंतवाडी ता.०८-:ऐन गटारी अमावस्येच्या दिवशी मद्यधुंद अवस्थेत गटारी साजरी करणाऱ्या युवकांनी एका निरपराध युवकास चोप दिला असून बादली देत नसल्याचे निमित्त साधत या युवकाची यथेच्छ धुलाई केली हे प्रकरण पोलिसात गेले असले तरी पुढे काय झाले हे समजू शकले नाही . सावंतवाडी शहरेतील प्रसिद्ध धबधब्यापाशी एक युवक आपली गाडी धुत होता यावेळी गटारी साजरी करीत नशेत गुंग असलेल्या युवकांनी या युवकाकडे बादली मागितली .मात्र गाडी धुत असलेल्या या युवकाने युवकाने “बादली” न दिल्याच्या कारणातून शहरातीलच मद्यधुंद युवकांनी त्याला मारहाण केली. हा प्रकार आज सायंकाळच्या सुमारास घडला. त्या युवकाने बचावासाठी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.मात्र पुढे काय झाले याची चर्चा सुरू होती.

You cannot copy content of this page