सुनील नेवरेकर यांच्यावतीने उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राला 25 कोव्हिड किट प्रदान

*⚡वैभववाडी दि.०८-:* उंबर्डे कुंभारवाडीचे सुपुत्र सुनील नेवरेकर यांनी उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राला डॉक्टर्स व नर्स यांना कोरोना बाबत दक्षता घेणेसाठी दिलेले 25 कोव्हिड किट सरपंच श्री. बोबडे यांच्या हस्ते प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीयअधिकारी डॉ. कारणसिंह पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत उंबर्डे येथे यासंदर्भात झालेल्या कार्यक्रमामध्ये*श्री.बोबडे सर यांनी श्री.सुनिल नेवरेकर हे आपल्या गावातील लोकांसाठी आरोग्य शिबीर घेऊन डोळ्यांचे ऑपरेशन,लोकांना मोफत चष्मे,कर्ण बधिरांसाठी 10 ते12 हजार किमतीचेश्रवणयंत्र(मशीन) मोफत पुरविले आहे याचा प्रामुख्याने उल्लेख केला त्याच बरोबर गावातील सर्व महिला एकत्र याव्यात त्यांनी विचारांची आदान-प्रदान करावी ,महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने “पैठणी”नावाचा कार्यक्रम घेऊन महिलांना पैठणी वाटल्या आहेत असे विविध उपक्रम स्वनिधीतून घेऊन श्री.सुनील नेवरेकर हे गावाच्या विकासासाठी हातभार लावत आहेत त्याबद्दल त्यांचे ग्रामवासीयांतर्फे आभार मानले. यावेळी उपसरपंच श्री.दशरथ दळवी,आबा दळवी,कुंभारवाडी मुबई मंडळाचे अध्यक्ष श्री.श्रीपत धामणकर,ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री. अनिल पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष रत्नाकर बंदरकर, केंद्रप्रमुख* *श्री.जाधव सर,हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री राटोड सर ,श्री आर. के. बोबडे सर ,शैलेश दळवी,ग्रामसेविका सौ.गुरखे उपस्थित

You cannot copy content of this page