*⚡बांदा दि.०८-:* गावठी वनौषधींपासून हजारो रुग्णांना बरे करणारे पाडलोस-माडाचेगावळ येथील कावीळ वैद्य विठ्ठल ऊर्फ नाथा मेस्त्री यांचे राहत्या घरी नुकतेच निधन झाले. सिंधुदुर्गसह गोवा राज्यातील अनेक कावीळ झालेले रूग्ण त्यांनी बरे केले. ‘नाथा’ यांना लहानपणापासून झाडांच्या पालापाचोळा व पाळेमुळे तसेच नारळाच्या पाण्यातून औषध तयार करण्याचे शिक्षण मिळाले. सावंतवाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग, कोल्हापूर तसेच गोवा राज्यातील म्हापसा, पेडणे, वास्को येथून काविळच्या औषधांसाठी रूग्ण यायचे. नाथा यांच्या जाण्याने पाडलोस मधील कावीळ वैद्य हरपल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, जावई, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते बाबलो मेस्त्री यांचे ते वडील होत.
पाडलोसमधील कावीळ वैद्य नाथा मेस्त्री यांचे निधन
