कणकवली महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील शिक्षण इंग्रजी माध्यमातून

*⚡कणकवली दि.०८-:* कणकवली महाविद्यालयात अकरावी ते एम.ए.,एम.काँम पर्यंतचे शिक्षण एकाच छताखाली देण्यात येत आहे.यामध्ये अकरावी व बारावी वाणिज्य शाखेतील शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून देण्यात येते परंतु एफ.वाय.बी.काँम. ते टी.वाय.बी.काँम.पर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून देण्यात येते होते.विद्यार्थ्यांचा या शाखेकडील कल पाहता अकरावी – बारावीतील इंग्रजी माध्यमात खंड पडू नये याचा विचार करून कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाने एफ.वाय.ते टी.वाय.बी.काँमपर्यंतचे शिक्षणही इंग्रजी माध्यमातून देण्याचे निश्चित केले आहे.या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना कणकवली महाविद्यालयातच अकरावी ( वाणिज्य ) ते एम.काँमपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातूनच पूर्ण करता येणार आहे. उच्च शिक्षणातील करिअर च्या संधी पाहता संस्थेने हा निर्णय घेतला आहे.या निर्णयानुसार कणकवली महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ यावर्षी पासून अकरावी वाणिज्य शाखा ते एम.काँमपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून देण्यात येणार आहे. तरी या शाखेकडे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी व या संधीचा सदुपयोग करून घ्यावा असे आवाहन कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांनी केले आहे.

You cannot copy content of this page