तहसीलदार म्हात्रे यांची बदली रद्द करा

देव्या सूर्याजी:अन्यथा १५ ऑगस्टला करणार आंदोलन

*⚡सावंतवाडी ता.०८ :* तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची रत्नागिरी येथे बदली झाल्याने राजकीय, सामाजिक क्षेत्रातून बदली रद्द करण्यात यावी अशी मागणी होत आहे. तहसीलदार म्हात्रे यांनी तालुक्यात कोरोना, तौक्ते वादळ, महापुर आदी संकट काळात स्वतः उतरुन चांगल्या प्रकारे काम केले असून प्रत्येक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी विशेष लक्ष घालून काम केले आहे. तसेच संकट काळात नागरिकांना धीर देऊन मदत केली आहे. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली करणे चुकीची असून त्यांना मुदतवाढ मिळावी, अन्यथा युवा रक्तदाता संघटनेचे पदाधिकारी १५ ऑगस्ट रोजी सर्व सामाजिक संघटनांसोबत शेकडोंच्या संख्येने धरणे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page