अवघ्या २४ तासांत मोबाईल चोराला घेतले ताब्यात;कपडे विक्रेत्याने मारला होता हात
*⚡ओरोस ता.०३-:* स्त्रीयांचे कापड पीस विक्रीसाठी आलेल्या एका परप्रांतीयाने चक्क मोबाईल चारून नेला. चोरण्यात आलेला मोबाईल अंगणवाडी सेविकेचा असल्याने तिने तात्काळ सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. २ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेची गंभीर दखल सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी घेत ताबडतोब चक्रे फिरविली. आज अशाप्रकारे घरोघरी विक्री करण्यास फिरणाऱ्या सात ते आठ विक्रेत्यांना पोलीस ठाण्यात आणत चौकशी केली. यातील परवेझ नावाच्या विक्रेत्याने आपण मोबाईल चारल्याची कबुली दिली. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले असून अवघ्या २४ तासांत चोरीचा तपास लावला. यामुळे सिंधुदुर्गनगरी पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे यांची हद्दीत एका अंगणवाडी सेविकेच्या घरातून त्यांचा शासकीय कर्तव्य करीता देण्यात आलेला मोबाईल स्त्रियांचे कापड पीस विकणारी परप्रांतीय व्यक्तीने घरातून काल २ ऑगस्ट रोजी चोरून नेला. याबाबत सिंधुदुर्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अमित यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गीते, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक जयवंत वारा, सहाय्यक पोलिस फौजदार जाधव, सहाय्यक पोलीस फौजदार गोसावी,पोलीस नाईक गवस असे मिळून शोध तपास करत होते. ३ ऑगस्ट रोजी गोपनीय माहितीनुसार गुन्ह्याचे तपास करताना गस्त करत रानबांबुळी, ओरोस, कसाल, पडवे हा परिसर पिंजून काढला. पोलीस उपनिरीक्षक अमित गीते, जयवंत वारा, स पो फौ जाधव आणि गोसावी यांनी गस्ती दरम्यान सर्व संशयित आरोपीना पकडून पोलीस ठाण्यात आणले. चौकशी दरम्यान त्यातील परवेझ नावाच्या आरोपीने त्या अंगणवाडी सेविका यांचे घरातून मोबाईल चोरल्याची कबुली दिली आहे. पोलीस ठाणे येथे आरोपीची अटक प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सहाय्यक फौजदार जाधव व पोलीस नाईक गवस करीत आहेत. पोलिसांनी जलद गतीने केलेल्या यशस्वी तपासाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
