Headlines

कट्टा येथील वराडकर ज्युनिअर कॉलेजमधून स्वरांगी माळकर प्रथम

*⚡मालवण दि.०३-:* कट्टा येथील वराडकर व कनिष्ठ महाविद्यालय कला व वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून या कनिष्ठ महाविद्यालयातून स्वरांगी संतोष माळकर ही ४९६ गुण मिळवून प्रथम आली आहे. या कनिष्ठ महाविद्यालयातून कला शाखेतून ४९ विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यातील दोन विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले तर प्रथम श्रेणीत २४ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत ५९ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यातील आठ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी प्राप्त केली तर ४९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि दोन विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेमधून प्रथम – स्वरांगी संतोष माळकर ४९६ गुण, द्वितीय – साक्षी सुमन जावकर ४९२ गुण, तृतीय – सानिका सतीश गावडे ४८० गुण मिळवून उत्तीर्ण झाले. कला शाखेतून प्रथम – नेहा हेमंत कदम ४८३ गुण, द्वितीय – चैत्राली रवींद्र हिर्लेकर ४७० गुण, तृतीय – पूर्वा प्रमोद रेवडेकर ४४४ गुण मिळविले. या सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे प्रा. एन.के. कांबळे, संस्था अध्यक्ष अजयराज वराडकर, विश्वस्त ऍड. एस.एस. पवार, सेक्रेटरी विजयश्री देसाई व संस्था चालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page