वेंगुर्लात नद्या, ओहोळांच्या पाण्याच्या पातळीत वाढ;

भातशेती पाण्याखाली

💫वेंगुर्ला दि.२२-: वेंगुर्ला तालुक्यात गुरुवारपासून पुन्हा पावसाने जोरदार सुरुवात केली. गुरुवारी सकाळपासून सतत पावसाची रिपरिप सुरू असल्याने तालुक्यातील नद्या, ओहोळांच्या पाण्याच्या वाढ झाली आहे. दरम्यान तालुक्यात सर्व जनजीवन सुरळीत होते.

  मागील ८ दिवस पडणा-या सतत पावसाने तालुक्यात बुधवारी विश्रांती घेतली होती. मात्र गुरुवार पासून पुन्हा पावसाने जोरदार सुरुवात केली. तर यामुळे पुन्हा पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. गेले ८ दिवस नद्या ओहोळाच्या शेजारी असणारी भातशेती पाण्याखाली होती. यामुळे शेतीचेही नुकसान झाले आहे. पुन्हा असाच पाऊस सुरू राहिल्यास शेतक-यांच्या चिंतेत वाढ होणार आहे.

  तालुक्याचा विचार करता येथील पमुख मार्गांवरील पुलांवर पाणी न आल्याने वाहतूक सायंकाळपर्यंत सुरळीत होती. तर पावसाची रिपरिप व अधूनमधून मुसळधार पाऊस हा सुरूच होता.  दरम्यान तालुक्यात गेल्या २४ तासात ३०.४० मिमी तर १ जून पासून एकूण २०६७.४० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
You cannot copy content of this page