💫कणकवली दि२२-: कणकवली -आचरा मार्गावर वरवडे फळसेवाडी येथे गुरुवारी सकाळच्या सत्रात पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे अशी माहिती कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी दिली
वरवडे सेंट उर्सुला स्कूलच्या दरम्याने पुलावर पाणी आल्याने फणसवाडी वरवडे या सकल भागामध्ये पाणी घुसल्याने रस्ते वाहतूकी साठी बंद झाले आहेत व काही गाड्याही तेथे थांबले असल्याचे समजत आहे कणकवली तालुक्यात काही गावात पाणी आल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे प्रशासनाच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क असून नागरिकांनी कणकवली तहसील कार्यालय कणकवली आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचे आवाहन कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी केले आहे
