💫सिंधुदुर्गनगरी दि२२-: जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 131 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 63.175 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2438.313 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 75(2316), सावंतवाडी - 50(2540.10), वेंगुर्ला - 30.40(2067.40), कुडाळ - 50(2286), मालवण - 29(2792), कणकवली - 77(2620), देवगड - 63(2274), वैभववाडी - 131(2611), असा पाऊस झाला आहे.
