💫कणकवली दि२२-: कणकवली तालुक्यात सुरू झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पडझड सुरू झाली असून, कणकवली शहरात देखील मुसळधार पाऊस व वादळी वारा झाल्याने घरावर झाड पडून नुकसान झाल्याची घटना कणकवली शहरातील हर्णे आळी भागात घडली आहे.
कणकवली शहरातील हर्णे आळी भागात संतोष ठाणेकर यांच्या घरावर झाड उन्मळून पडून त्यांच्या घराचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कणकवली नगरपंचायतचे पथक झाड हटविण्याच्या कामासाठी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.नगरपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत हे झाड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करून झाड हटविण्यात आले.
