कलमठ शिवसेनेच्यावतीने तहसीलदारांकडे मागणी
*💫कणकवली दि.२१-:* कणकवली तालुक्यातील कलमठ गावात तलाठी कार्यालयात न येता वारंवार गैरहजर राहत आहेत.सर्व सामान्य नागरिकांना मंडळ अधिकारी कार्यालयामध्ये येऊन भेटा अशी उत्तरे देत आहेत.कामात टाळाटाळ करत वारंवार रजेवर राहत नागरिकांना संबंधित तलाठी त्रास देत आहेत.कामचुकार, गैरहजर राहण्याऱ्या तलाठ्यांची बदली करा.कलमठ शिवसेनेच्यावतीने मागणी करण्यात आली.कलमठ गावाला कायमस्वरुपी तलाठी द्यावा,अश्या मागणीचे निवेदन तहसीलदार रमेश पवार यांना दिले आहे. यावेळी जि.प.सदस्या स्वरुपा विखाळे,महिला जिल्हा संघटक निलम सावंत-पालव,कलमठ सरपंच वैदेही गुडेकर ,शिवसेना विभागप्रमुख अनुप वारंग,ग्रा.पं.सदस्य राजु राठोड,ग्रा.पं.सदस्य बाळू मेस्त्री,सामाजिक कार्यकर्ता विलास गुडेकर उपस्थित होते.
