खास.राऊत यांच्याशी मैत्री करणारे नितेश राणे हे इडीची धमकी केसरकरांना देतात याचा अर्थ काय?

परशुराम उपरकर यांचा सवाल;स्वार्थासाठी हे लोकप्रतिनिधी एकत्र आले

*💫सिंधुदुर्ग दि.२१ प्रसन्न गोंदावळे-:* खासदार विनायक राऊत आमदार नितेश राणे यांची पाठ थोपटवत मित्र आल्याचे जाहीर करतात. तर खासदारांच्या पक्षातील एका आमदाराला नितेश राणे इडी लावण्याची धमकी देतात. स्वतःचा स्वार्थासाठी हे लोक प्रतिनिधी एकत्र आले असल्याची टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे. परंतु, नितेश राणे यांना मित्र म्हणणारे खासदार राऊत हे राणेंना आमदार दिपक केसरकर यांच्यावर इडी लावण्यापासून वाचविणार की, इडी लावू देणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे जनतेने लोक प्रतिनिधी चा हा डाव जनतेने वेळीच ओळखावा असे मत व्यक्त केले आहे. हे लोक प्रतिनिधी जिल्ह्याचा विकास करण्यासाठी एकत्र येणार नाहीत. परंतु जनतेची दिशाभूल करण्यासाठी एकत्र येतील, असा आरोप देखील उपरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

You cannot copy content of this page