दीपक चहरचा ‘कहर’

श्रीलंकेच्या जबड्यातून सामना खेचून आणला, टीम इंडियाचा मालिका विजय

*💫सिंधुदुर्ग दि.२०-:* श्रीलंकेच्या ९ बाद २७५ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा निम्मा संघ ११६ धावांवर माघारी परतला होता. सूर्यकुमार यादवनं वन डे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावताना कृणाल पांड्यासह टीम इंडियाच्या विजयाच्या आशा पल्लवीत ठेवल्या होत्या. पण, ही दोघं माघारी परतली अन् श्रीलंकेचा संघ निर्धात होऊन, विजय आपलाच असा बागडू लागला. पण, दीपक चहरनं त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडवला. त्यानं वन डेतील पहिले अर्धशतक झळकावताना उपकर्णधार भुवनेश्वर कुमारसह संघर्ष केला. प्रचंड दडपणातही चहरनं अफलातून खेळी केली. ४७व्या षटकात त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेले, तरीही त्यानं संघर्ष केला. ७ बाद १९३ वरून दीपक-भुवीनं सामना खेचून आणला. या दोघांमुळे श्रीलंकेच्या ताफ्यात ‘कभी खूशी, कभी गम’ असे वातावरण झाले.

You cannot copy content of this page