सावंतवाडीतील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त महापूजा

*💫सावंतवाडी दि.२०-:* सावंतवाडीतील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात आज आषाढी एकादशी निमित्त महापूजा संपन्न झाली. यावेळी सावंतवाडीचे माजी प्रांताधिकारी अविनाश सुभेदार यांनी सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची महापूजा केली. त्यानंतर काकडा आरतीने अखंड नामस्मरणाचा प्रारंभ झाला. विठ्ठल नामाचा गजर करीत मोजक्‍याच वारकरी व भक्तांच्या उपस्थितीत सावंतवाडीतील प्राचीन विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीकर नागरिक व अन्य भक्तगणांसाठी ऑनलाइन दर्शनाची सुविधा यावर्षी करण्यात आली होती. विठ्ठल भक्तीच्या गजरात भक्तीरसाचा हा आनंद सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांनी स्वतः विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले आहे.

You cannot copy content of this page