वराडकर हायस्कूलचे कला शिक्षक समीर चांदेरकर यांनी साधले आषाढी एकादशीचे औचित्य!
*💫मालवण दि.२०-:* सोनी सब आणि झी मराठी या टीव्ही चॅनेलवरील कार्यक्रमात कॅनव्हासवर छत्रपती शिवाजी महाराज रेखाटून दर्शकांची वाहवा मिळविणाऱ्या मालवण कट्टा येथील वराडकर हायस्कूलचे कला शिक्षक समीर चांदेरकर यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून तांदळाच्या दाण्यावर विठ्ठलाचे चित्र साकारले आहे. छोट्यात छोटा ब्रश याचे केस कापून तो आणखी लहान करून बहिर्वक्र भिंगाच्या मदतीने समीर यांनी हे चित्र साकारले आहे. तांदळा वरील विठ्ठलाचे रूप पूर्ण पाहणाऱ्यालाही बहिर्वक्र भिंगाचा वापर करावा लागत आहे. खरंतर एव्हड्या छोट्या आकारातील चित्र साकरण्याचा श्रीं समीर चांदेरकर यांचा हा पहिलाच प्रयत्न असून त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला आहे तांदळाच्या दाण्याचा आकार आहे १मिली मीटर ×7मिली मीटर असून या दाण्यावर साकारलेली कलाकृती पाहण्यासाठी बहिर्वक्र भिंगाचा वापर करावा लागत आहे याबाबत बोलताना कला शिक्षक श्री चांदेरकर यांनी या कलाकुसरीबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले, प्रत्यक्ष पेंटिंग करताना मला बहिर्वक्र भिंगाचा वापर करावा लागला,,तांदळाच्या दाण्याचा आकार लहान असल्याने पेन्सिल ड्रॉईंग करणं अशक्य होतं त्यामुळेच थेट रंगकामातूनच विठ्ठलाचे रूप साकारले हे चित्र रेखाटताना ब्रशचे केस कापलेले आहेत, प्रत्यक्षात हा ब्रश झिरो नंबर चा होता परंतु अपेक्षित परिणाम मिळत नसल्यामुळे या ब्रशचे काही केस कापले असे ते म्हणाले
