मालपे येथील रस्त्याला पडल्या भेगा;वाडा पुलावर पाणी
*💫देवगड दि.१९-:* तालुक्यामध्ये रविवारी मुसळधार पाऊस पडल्याने संपुर्ण तालुका जलमय झाला होता. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी शेतजमिन पाण्याखाली गेल्या होत्या. मालपे येथील रस्ता खचून रस्त्याला भेगा पडल्या आहेत. तर सर्वाधिक पावसाची एका दिवसाची सर्वाधिक नोंद यावर्षी 200 मिली ची झाली आहे. रविवारी तालुक्यामध्ये दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडत होता. यामुळे वाडा पुलावरुन जोरदार पाणी वाहत असल्याने सुमारे 5 तास वाहतुक ठप्प झाली होती. तसेच तालुक्यातील बहुतांश गावामध्ये शेत जमिनीमध्ये व रस्त्यावरती पाणी साचल्याने संपुर्ण गावे जलमय झाली होती. मालपे येथील रस्त्याला भेगा पडून रस्त्याच्या बाजूचा संरक्षण कटडा देखील पावसाच्या पाण्याने वाहुन सदर रस्ता वाहतुकिस धोकादाय बनला आहे. काहि ठिकाणच्या खार बंधा-यांची देखील मोठया प्रमाणात नुकसानी होवून खार बंधारे फुटले आहेत. तसेच रस्त्याच्या साईडपटयांदेखील मोठया प्रमाणात धुप झाली आहे. तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस हा रविवारी पडला असून 200 मिली मिटर पावसाची सर्वाधिक नोंद देवगड तालुक्यामध्ये झाली आहे. एकुण तालुक्यामध्ये सुरुवातीपासून आता पर्यंत 2059 मिली पाऊस पडला आहे
