पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिये संदर्भात सिंधुदुर्गनगरी आकाशवाणीवर मार्गदर्शन

*💫मालवण दि.१९-:* महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालय यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता होणारी केंद्रीभूत अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रवेश प्रक्रिये संदर्भात शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे प्राध्यापक दत्तप्रसाद गोलतकर यांची श्रीपाद कहाळेकर यांनी घेतलेली मुलाखत आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी (FM 103.6 MHz) केंद्रावरुन दि. २० जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. या मुलाखतीमधून प्रवेश अर्ज नोंदणी तसेच निश्चिती संदर्भात परिपूर्ण माहिती दिली जाणार आहे. तसेच पॉलिटेक्निक मधील करिअरच्या संधी व शिष्यवृत्ती योजनांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी व पालकांनी सदर मार्गदर्शनाचा आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्राच्या माध्यमातून लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी डॉ. योगेश महाडिक – ९४२३६८२८४६ यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील तसेच प्रवेश प्रक्रिया समन्वयक डॉ. संजय चोपडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page