दुचाकी चोरी प्रकरणातील संशयितास अटक

*💫कणकवली दि.१९-:* कणकवली तालुक्यातील तळेरे गावठणवाडी येथील दत्तात्रय लक्ष्मण खटावकर यांची दुचाकी चोरी केल्याप्रकरणी संशयित आरोपीला कणकवली पोलीसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली आहे. दत्तात्रय खटावकर यांची दुचाकी क्रमांक एम एच ०७ ए के २९२० ) ही चोरीस गेल्याची घटना रविवारी घडली होती. तर संबंधित दुचाकी ही कणकवली पोलिसांच्या तपासात विजयदुर्ग हद्दीत मिळून आली. तसेच त्या आरोपीचा शोध घेत असता तो आरोपी देवगड तालुक्यातील पोंभुर्ले रतामटेंबवाडी येथील त्याच्या घरी असल्याची माहिती समजली. त्यावेळी तेथून त्याला कणकवली पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. या घटनेचा अधिक तपास हवालदार के पी कदम करीत आहेत.

You cannot copy content of this page