अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी कणकवलीतील आप्पासाहेब पटवर्धन चौकात लावले बॅरिकेट

*💫कणकवली दि.१९-:* कणकवली येथील उड्डाण पुलाच्या गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनचा रस्ता खचल्याने दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक सर्विस रोडवरून होत असल्याने अपघाताची शक्यता टाळण्यासाठी कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात बाजारपेठेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर पोलीसानी बॅरिकेट लावले आहेत.त्यामुळे वाहनधारकांना आता हे बॅरिकेट बाजूला करून जावे लागत आहे. तीन दिवसापूर्वी कणकवली येथील उड्डाणपुलाच्या एक लेनचा रस्ता खचला होता. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनंतर सदरच्या रस्त्याची डागडुजी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी या लेनवरून वाहतूक बंद करण्यात आली आहे .त्यामुळे वाहतूक सर्विस रोडवरून सुरू असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून पोलिसानी बाजारपेठेच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावर बॅरिकेट लावत अपघात टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

You cannot copy content of this page