आरोग्य सभापती डॉ अनिशा दळवींचे आढावा बैठकीत आदेश
*💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* जिल्हयात सध्या पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे साथरोग जन्य आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे आजार पसरु नयेत म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आदेश जिल्हा परिषद आरोग्य सभापती डॉ अनिशा दळवी यानी सोमवारी आढावा बैठकीत आरोग्य प्रशासनाला दिले. जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीची आढावा बैठक सोमवारी डॉ. अनिशा दळवी यांच्या उपस्थितीत त्यांच्या दालनात पार पडली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे तसेच आठही तालुक्यातील तालुका वैदयकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्हयात गेली काही दिवस सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून जिल्हयात साथरोगजन्य आजार पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुका पातळीवर योग्य ती खबरदारी घेत हिवताप, डेंग्यू, मलेरीया या आजारापासून जिल्हातील जनतेला दूर ठेवण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच वेळीच योग्य त्या उपाययोजना करा अशा सुचना आरोग्य सभापती डॉ. अनिशा दळवी यांनी केल्या.
