सरपंच पूजा घाडीगांवकर यांनी निवेदनाद्वारे केली मागणी
*कणकवली दि.१९-:* गेले तीन झालेल्या अतिवृष्टीमुळे कणकवली तालुक्यातील वागदे-कसवण-आंब्रड जाणारा रस्ता खचला असून रस्त्याचा काही भाग जवळपास एक ते दीड फूट खचल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. तर वागदे मांगरवाडी येथे हा रस्ता खचल्याने मोटरसायकल वगळून या मार्गावरील अन्य वाहतुक ठप्प झाली आहे. दरम्यान आज वागदे सरपंच, सदस्य व नागरिक यांनी पाहणी केली तसेच वाहतुकीस हा महत्वाचा रस्ता असल्याने रस्ता तात्काळ पुर्वरत करावा, अशी मागणी करत कणकवली बांधकाम विभाग व तहसीलदार यांना तसे वागदे सरपंच पूजा घाडीगांवकर निवेदनही दिले. यावेळी उपसरपंच रुपेश आमडोस्कर,ललित घाडीगांवकर,उमेश घाडीगांवकर उपस्थित होते.
