आम.दिपक केसरकर यांच्यावर आम.नितेश राणे यांनी लगावला टोला
*💫सावंतवाडी दि.१९-:* कणकवली मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी आज सावंतवाडी नगरपालिकेला भेट दिली असता, यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी आमदार दिपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, शांत संयमी असणाऱ्या केसरकरांना थेट संपवण्याची भाषा करावी लागते, यावरूनच दाल में कुछ तो काला है, या फिर पुरी दाल ही काली है असा टोला लगावला आहे. यात जर त्यानी यात काहीच केलं नाही. तर त्यांची एवढी चिडचिड का होत आहे. असा सवाल उपस्थित केला आहे. खेळण्यांमध्ये झालेला घोटाळा ही केवळ शेपूट असून, मंत्रिपदाचा गैरवापर करून जमवलेली बेहिशेबी मालमत्ता व गोव्यातील गुंतवणूक यांची योग्य वेळ आल्यावर इडी मार्फत चौकशी लावू, असा इशारा भाजपचे युवा नेते तथा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, भाजपा शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा समिती सभापती उदय नाईक, आनंद नेवगी महिला शहरध्यक्ष मोहिनी मडगावकर व अन्य नगरसेवक उपस्थित होते.
