*💫मालवण दि.१३-:* आचरा पशुवैद्यकीय दवाखाना येथे पशुधन पर्यवेक्षक पदावर कार्यरत असलेले डॉ उमेश पेंडूरकर याची सहाय्यक पशुधन अधिकारी पदोन्नतीने पशुवैद्यकीय दवाखाना कोचरे येथे बदली झाली आहे. याबाबत कार्यभार स्विकारण्याचा आदेश मालवण गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांनी दिला आहे. आचरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात ते गेली सात वर्षे कार्यरत होते. शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वेळी अवेळी धावून जाणारे डॉक्टर अशी ख्याती असलेल्या पेंडूरकर यांच्या पदोन्नती बद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्यां पदोन्नती ने बदलीमुळे रिक्त होणाऱ्या आचरा पशुवैद्यकीय दवाखान्याचा कार्यभार वसंत सवादे हे रजेवरुन हजर होईपर्यंत आडवली पशुवैद्यकीय दवाखान्याच्या मिताली कवटकर यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला आहे. पेंडूरकर यांच्या पदोन्नती बद्दल जिल्हा परिषद सदस्य जेरॉन फर्नांडिस, आचरा सरपंच प्रणया टेमकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर, आदींनी अभिनंदन केले आहे
आचरा पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ पेंडूरकर याची पदोन्नती
